शहाजी राजे भोसले (१५९५-१६६४)

मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे हे मोठे पराक्रमी व कर्तृत्वान व्यक्तिमत्व होते.ते विजापूर,अहमदनगर या शह्यांत सरदार होते.ते मोगलांच्या सेवेतही होते.महाराष्ट्रातील इंदापूर,सुपे,पुणे व चाकण आणि महाराष्ट्राबाहेरील बंगळूर व वेलोर हे प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होते. शिवाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाबाई यांचे पुत्र.शिवाजी राजे यांच्या स्वराज्य-स्थापनेस शहाजीराजांचा पाठिंबा होता.दादाजी कोंडदेव,सोनोपंत डबीर,शामराव नीलकंठ,कान्होजी जेधे यांसारखे निष्ठावंत सेवक शहाजीराजांनी बंगळूरहून महाराष्ट्रात पाठवले व त्यांनी शहाजीराजांच्या येथील मुलखाची व्यवस्था लावली.या मुलखाचा पुढे शहाजीराजांना आपल्या स्वराज्यकारणात बराच उपयोग झाला. शहाजीराजांनी पुणे व सुपे भागात स्वतंत्र सत्तास्थापनेचे प्रयत्न केले होते; पण त्यात त्यांना यश आले नाही. मात्र बंगळूरमध्ये ते स्वतंत्रपणे वागत असत. दूर बंगळूरहून ते शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या हालचालींकडे सहानुभूती पूर्ण दृष्टीने पाहत असत. त्यांनी अनेक विद्वान. पंडित व कवींना आश्रय दिला होता त्यांना संस्कृत...