शहाजी राजे भोसले (१५९५-१६६४)



मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे हे मोठे पराक्रमी व कर्तृत्वान व्यक्तिमत्व होते.ते विजापूर,अहमदनगर या शह्यांत सरदार होते.ते मोगलांच्या सेवेतही होते.महाराष्ट्रातील इंदापूर,सुपे,पुणे व चाकण आणि महाराष्ट्राबाहेरील बंगळूर व वेलोर हे प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होते.
        शिवाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाबाई यांचे पुत्र.शिवाजी राजे यांच्या स्वराज्य-स्थापनेस शहाजीराजांचा पाठिंबा होता.दादाजी कोंडदेव,सोनोपंत डबीर,शामराव नीलकंठ,कान्होजी जेधे यांसारखे निष्ठावंत सेवक शहाजीराजांनी बंगळूरहून महाराष्ट्रात पाठवले व त्यांनी शहाजीराजांच्या येथील मुलखाची व्यवस्था लावली.या मुलखाचा पुढे शहाजीराजांना आपल्या स्वराज्यकारणात बराच उपयोग झाला.
        शहाजीराजांनी पुणे व सुपे भागात स्वतंत्र सत्तास्थापनेचे प्रयत्न केले होते; पण त्यात त्यांना यश आले नाही. मात्र बंगळूरमध्ये ते स्वतंत्रपणे वागत असत. दूर बंगळूरहून ते शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या हालचालींकडे सहानुभूती पूर्ण दृष्टीने पाहत असत. त्यांनी अनेक विद्वान. पंडित व कवींना आश्रय दिला होता त्यांना संस्कृत, कन्नड व फारसी या भाषा ही उत्तम प्रकारे अवगत होत्या.
        कर्नाटकातील होदिगेरे येथील जंगलात शिकारीला गेले असताना, शहाजीराजांच्या घोड्यावरून पडून इ.स. १६६४ साली मृत्यू झाला. होदिगेरे कर्नाटक येथे त्यांची समाधी आहे.


-------------------------------------------------------------------

English Translation

Shahoji Raje, the eldest son of Maloji Raje, was a mighty and accomplished personality. He was a chief in the cities of Bijapur and Ahmednagar. He was also in the service of the Mughals.
        Shivaji Raje was the son of Shahaji Raje. He was a supporter of Shahaji Raje.
        Shahaji Raja had tried to establish independent power in Pune and Supe areas;  But they did not succeed.  But in Bangalore, they were behaving independently.  Far from Bangalore, he was sympathetic to Shivaji Raj's movement for self-government.  He is a scholar.  Pundits and poets were given shelter. They were well versed in Sanskrit, Kannada and Persian.
        While hunting in the forest at Hodigere in Karnataka, he fell from Shahaji Raja's horse.  He died in 1664.  His Samadhi is at Hodigere Karnataka.

Comments

Popular posts from this blog